#युवराज_सिध्दार्थचा_राजमहाल
या शिल्पात युवराज सिध्दार्थ हे त्यांच्या राजशाही महालात बसलेले आहे. त्याच्या जवळ सुंदर स्त्री गराडा जणू अप्सरा आहेत. त्यांनी युवराजला ..आकर्षित.. करण्याचा प्रयत्न केला, पण युवराज त्यांना जरा सुद्धा डगमगलेला नाही. ...स्थिर, संयमित कुठल्याही शारीरीक हालचाली किंवा आकर्षणाला किंवा स्पर्शाला... न भुलता ...शांन्त चित्ताने... बसलेले दिसत आहे. गायन, वादन व नृत्यांगना नृत्य करत आहे. एक सुंदर स्त्री जणू ...अप्सरा... युवराज जवळ पलंगावर बसली आहे.
असतमुनीने केलेली भविष्यवाणी की,!!! "राजकुमार सिद्धार्थ गृहस्थ जीवनात राहणार नाही. राजकुमार निश्चित ...गृहत्याग... करून जगाला मार्ग दाखवणारा *"'सम्यक संबुध्द"'* होईल." हि "भविष्यवाणी" खरी होऊ नये म्हणून राजा शुध्दोधनाने युवराजला ..."वैषयिक"... सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश ठेवून शुध्दोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन..... राजमहल बांधले ...एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, ...एक पावसाळ्यात राहण्यासाठी व...एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे राजमहल विलासी जीवनाला 'उत्तेजक' अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. उत्तेजित करणारे "मद्य व सुगंधीत द्रव्य" यांची देखील व्यवस्था केली होती. शुध्दोधन राजाने राज्यातील सर्वात "सुंदर स्त्रीयांची" व्यवस्था तिन्ही महालात करण्यात आली होती. हेच या शिल्पात दाखवण्यात आले आहे.
हि सर्व किमया त्या अनामिक शिल्पकराची आहे.
अश्या प्रकारची शिल्पे आपल्या लेणीत अथवा संग्रहालयात पाहावयास मिळतात.
.........
#maharathi #महारठी #jambudweep #satwahan #सातवाहन #क्षत्रप #नागनिकाराणी #dhammapada #palilanguage #dhammalipi #india #maharashtra #Marathi #ABCPR #प्रबुद्धमहारठी #dhammalipi #धम्मलिपी #dhammapada #palidhammalanguage
Comments
Post a Comment